चोपडा विरवाडे रस्त्यावर आर्टिका गाडीला भीषण अपघात २ तरूण जागीच ठार..३ जण गंभीर

 चोपडा विरवाडे रस्त्यावर आर्टिका गाडीला भीषण अपघात २ तरूण जागीच ठार..३ जण गंभीर 


चोपडा दि.१६(प्रतिनिधी)चोपडा विरवाडे रस्त्यावर आर्टिका चार चाकी गाडीला भीषण अपघात होऊन २ युवक जण जागीच ठार झाले असून अन्य तीन जन गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास विरवाड्याहून चोपड्याकडे येताना हा अपघात झाला आहे.

 जैन समाजाचा पारमार्थिक कार्यक्रमासाठी चोपड्याकडे रामप्रहरी निघालेली आर्टीका गाडी (क्रमांक एम एच 19 बी एस 1008) येत असताना भीषण अपघात होऊन राहूल अमृत भोई व मयुर अरूण राजपूत या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत अपघात स्थळी उपस्थितांनी धाव घेऊन तातडीने मदतकार्य  करून जखमींना रुग्णालयात हलविले आहे.

या घटनेतील जखमींची नावे अशी, विजय अमृत भोई ( वय 35वर्षे ) ,राकू राजपूत (वय अंदाजे 30 वर्षे) व बंटी कोळी ( वय30 वर्षे ) हे तिघे जबर जखमी झाले असून यातील विजय अमृत भोई याची प्रकृती चिंताजनक आहे त्यास पुढील उपचारार्थ  जळगाव येथे हलवण्यात आलेले आहे तर राकू राजपूत व बंटी कोळी यांना जबर दुखापत  चोपडा येथील मोरेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यातील एकाचे पाय तर एकाचे हातांना गंभीर दीखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे 

देवा तू आहे की नाय? असा आक्रोश

अपघातातील पाचही तरुण हे जैन धर्मियांचा धार्मिक कार्यक्रमाला दररोज येत होते.व  कार्यक्रमाला हजेरी लावत होते.त्याकारणास्तव गेल्या आठ दिवसापासून स्वतःच्या घरचे अन्न व पाणी देखील प्राशन केलेले नव्हते इतका कट्टर उपवास करूनही देव आडवा का आला नाही."देवा तू खरंच आहे तरी कुठे? असा टाहो मयताच्या नातलगांनी फोडला आहे.या आक्रोशाने संपूर्ण शोक सागरात बुडाले आहे.आज शेवटच्या दिवशी साडेतीन वाजेनंतर आपले घरचे अन्न पाणी घेणार होते त्याआधीच काळाने झडप  मारल्यानेसर्वत्र  हळद व्यक्त करण्यात येत असून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू धाळत आहेत.घटनास्थळी पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी धाव घेतली असून अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने