चोपडा शिवसेना बैठकीत नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार.. 🔲आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा : आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे आदेश

 

चोपडा शिवसेना बैठकीत नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार..
🔲आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा : आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे आदेश


चोपडा दि.१३(प्रतिनिधी) :येथील बोथरा मंगल कार्यालय येथे  शिवसेनेची चोपडा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजीआ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार  पडली. बैठकीत चोपडा नगरपालिकेचे  नवनिर्वाचित नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष,व नगरसेवक व जळगाव महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित  नगरसेविका डॉ. अमृताताई सोनवणे व डॉ.गौरवदादा सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद  व ग्रामंचायत  सार्वत्रिक निवडणुक २०२६ यावर चर्चा आणि तसेच संघटनात्मक बांधणी संदर्भात आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. 

या बैठकीस सौ. लताताई सोनवणे (माजी आमदार),सौ. नम्रताताई पाटील (नगराध्यक्षा),श्री. नरेंद्र पाटील (सभापती कृउबा),श्री.पंकज बोरोले (उपनगराध्यक्ष),डॉ.अमृताताई सोनवणे (नगरसेविका मनपा), डॉ .गौरवदादा सोनवणे (नगरसेवक मनपा),हुसेन खाँ पठाण (बांधकाम सभापती),किशोर चौधरी (पाणीपुरवठा सभापती),सौ.देवयानीताई माळी (महिला व बालकल्याण सभापती),अमोल पाटील (शिक्षण सभापती), रमाकांत ठाकुर (गटनेते), नगरसेविका सौ.वंदनाताई पाटील,रुखसारबी बागवान,सौ.भारतीताई चौधरी,सौ.दिपालीताई चव्हाण,सौ.वैशालीताई पवार,सौ.निशाताई जैन,फरमान मिस्तरी, प्रविणबाबा देशमुख,अकिल जहागीरदार,हनीफशेठ सत्तार,दिपकाआबा पाटील, कृउबा संचालक ॲड. शिवराज पाटील, गोपाल पाटील, रावसाहेब पाटील, किरण देवराज,सुर्यभान पाटील सर,प्रताप आण्णा पाटील,सुभाष आप्पा साळुंखे, अरुण पाटील,एम.व्ही.पाटील सर,बबलु कोळी,मुन्नाभाऊ पाटील,रमेशनाना सोनवणे,विकास पाटील,प्रकाश राजपूत,नामदेव पाटील, भरत चौधरी सर,साहेबराव शिरसाठ, कैलास बाविस्कर, प्रताप पावरा,मंगलाताई पाटील,अनिताताई शिरसाठ,शितलताई देवराज व तसेच मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी,बुथप्रमुख, शिवदुत, प्रसिद्धी प्रमुख व सोशल  मिडीया प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने