चहार्डी जि .प. मुलांच्या केंद्र शाळेत पद्मालया सीड्स तर्फे मुलांना मोफत ट्रॅक सूट वाटप
चोपडा दि.१३(प्रतिनिधी) :-तालुक्यातील चहार्डी येथील जि. प. मुलांच्या केंद्र शाळेत पद्मालया सीड्स प्रायव्हेट लिमिटेड चोपडा तर्फे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत ट्रॅक सूट (40) वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते, श्री श्री चंद्रकांत पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मालयासिडचे संचालक दादासो राहुल पाटील, श्री सुभाष पाटील एसटी महामंडळ निवृत्त लिपिक, श्री मनोहर पाटील लघुउद्योजक, श्री व्ही.आर. सोनवणे सर सेवानिवृत्त प्राचार्य शा शि. पाटील विद्यालय, श्री भगवान चौधरी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते श्री हिम्मत नाना पाटील, श्री हर्षल पाटील प्राथमिक शिक्षक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक केले तर पद्मालयासिडचे संचालक श्री राहुल पाटील यांनी यापुढे शाळेच्या भौतिक सुविधांसाठी नेहमी मदत केली जाईल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीमती मीनाक्षी मोरे मॅडम , सूत्रसंचालन संभाजी पाटील सर तर आभार प्रदर्शन जीवन पाटील सर यांनी मानले.
