कोळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते लखिचंद श्रावण बाविस्कर यांचे वृद्धापकाळाने निधन

 कोळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते लखिचंद श्रावण बाविस्कर यांचे वृद्धापकाळाने निधन ..आज अंत्ययात्रा 

चोपडा,दि.१३ (प्रतिनिधी) वाल्मिक नगर येथिल रहिवासी कोळी समाजाचे खंदे कार्यकर्ते ज्येष्ठ समाजसेवक लखिचंद श्रावण बाविस्कर ऊर्फ एल्.एस.बाविस्कर सेक्शनल इंजिनिअर, भुसावळ रेल्वे) रा.वडगावसिम यांचे  दि.१३/२/२०२६ (वार- शुक्रवार) रोजी रात्री ९:४५ वा. वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८५वर्षे होत.त्यांची अंत्ययात्रा दि.१४/२/२०२६ (वार-शनिवार) रोजी स.११ वाजता महर्षी वाल्मिकी नगर (गोरगावले रोड) चोपडा येथील राहत्या घरापासून निघणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी व भगिनी असा परिवार आहे.

त्यांनी आदिवासी कोळी समाजाचे मोठ मोठे सामुहिक विवाह सोहळा पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने