चोपडा -ब्रहानपूर- अंकलेश्वर हायवे महामार्गासाठी अधिग्रहीत शेत जमीनीच्या मोजमापास नारोद शिवारापासून प्रारंभ
नारोद,ता.चोपडा दि.14(प्रतिनिधी) चोपडा -ब्रहानपूर- अंकलेश्वर नॅशनल हायवे महामार्गासाठी अधिग्रहण होत असलेल्या शेत क्षेत्राचे मोजमाप करण्यास काल दिनांक 13/02/2026 पासून सुरुवात झाली आहे नारोद व खरद शिवारात काही गटातील शेत मोज मापास भूमी अभिलेख कार्यालयाने कृषी व महसूल विभाग संबंधितांचा चमू हाती घेत जोमाने सुरूवात केली आहे.
चोपडा तालुक्यातील नारोद या गटात यादव पौलाद पाटील, नवल पौलाद पाटील, राहुल नवल पाटील ,महेश चिरंजीलाल शर्मा ,चंदू पाटील ,पांडुरंग सिताराम पाटील, पंकज पाटील यांच्या शेतात मोजणी झाली आहे.तसेच खरद शिवारातील ४१ व ४२या गटातील संबंधित शेतकऱ्याच्या शेतीचे मोजमाप केले आहे.
सदरील कामगिरी भूमी अभिलेख कार्यालयातील भू कर मापक गणेश शिंदे, अडावद भूमापक पर्यवेक्षक संजय भीमराव मनोरे ,कृषी सहाय्यक प्रतिभा महाजन, आरएनटी श्री.पवार, नारोद ग्राम विकास अधिकारी पवन पवार ,कृषी कर्मचारी हे पार पडत आहेत. यावेळी संबंधित बहुतांश शेतकरी उपस्थित होते.
