हातेड बुद्रुक वि.का.सोसायटी चेअरमनपदी प्रतापराव सोनवणे यांची बिनविरोध निवड
चोपडा दि.०९(प्रतिनिधी):-तालुक्यातील हातेड बुद्रुक व गलवाडे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदावर चोपडा कॉलेजचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रतापराव लोटन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आधीचे चेअरमन वसंतराव वामन बाविस्कर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणुकीत एकच अर्ज प्राप्त झाल्याने त्या जागेवर प्रतापराव सोनवणे यांची बिनविरोध करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून श्री.बारी साहेब यांनी काम पाहिले. बिनविरोध निवडीबद्दल प्रतापराव सोनवणे यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पॅनल प्रमुख माजी सरपंच मनोज सनेर (विक्की डॉक्टर), विजय सोनवणे, संजीव सोनवणे, देविदास सोनवणे, शिवाजी सोनवणे, सुभाष सोनवणे, कैलास सोनवणे, सुधाकर पवार, विनोद सोनवणे, किरण सोनवणे, सेक्रेटरी विकास पाटील, अरुण भदाणे, सुरेश सनेर, स्वप्निल सोनवणे व सर्व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन किरणकुमार सोनवणे यांनी केले.
