श्री संताजी महाराज जयंती चोपडा येथे उत्साहात संपन्न
चोपडादि.०९(प्रतिनिधी) श्री संताजी जगनाडे महाराज जयंती चोपडा येथे तेली समाजातर्फे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यानिमित्त 8 डिसेंबर 2025 रोजी श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा या संस्थेतर्फे भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झालेत.
सकाळी 6 वाजता संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर तेली समाज मंगल कार्यालय श्रीराम नगर चोपडा येथे संताजी महाराज मूर्तीची पूजा, माल्यारपण व आरती करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष के डी चौधरी, उपाध्यक्ष टी एम चौधरी,कोषाध्यक्ष राजेंद्र गणपत चौधरी,सदस्य नारायण पंडीत चौधरी, देवकांत दादा चौधरी,गोपीचंद महाराज चौधरी,शशिकांत सुभाष चौधरी,दिलीप चौधरी,भोला बाबा,सौ धनश्री देवकांत चौधरी, सूर्यकांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी 5 वा.छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक चोपडा येथे महा आरती करण्यात आली. संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची पूजा करून हार घालून संताजी महाराज यांच्या नावाने जयघोष करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्षके डी चौधरी सर व उपाध्यक्ष टी एम चौधरी सर ह भ. प बापू महाराज लासूर यांची समयोचित भाषणे झालीत.टी एम चौधरी यांनी संताजींचे जीवन परिचय दिला. संताजींनी तुकाराम महाराज यांची गाथा नव्याने लिहून काढली. संताजींमुळे संत तुकाराम महाराज जगाला कळाले. हे महान कार्य संताजींनी केले. असे महत्त्वपूर्ण विचार त्यांनी मांडले.यावेळी श्री सुभाष एकनाथ चौधरी, राजेंद्र गणपत चौधरी, शशिकांत सुभाष चौधरी, देवकांत कालिदास चौधरी, यांनी सपत्नीक संताजींची पूजा व आरती केली. यावेळी गोपीचंद महाराज, संदीप चौधरी, ॲड एस डी पाटील, सूर्यकांत के चौधरी,रमाकांत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी प्रसाद वाटप करण्यात आले.कार्यक्रमानंतर के डी चौधरी यांनी जयंती ते पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमानची माहिती दिली. दि.9डिसेंबर ते 15डिसेंबर या काळात दुपारी 2 पासून 5वाजेपर्यंत महंत अशोकदासजी महाराज यांच्या अमृतवाणीद्वारे श्रीमद भागवत कथा होणारं आहे. व रोज रात्री 8 वाजता नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत व 16डिसेंबरला सकाळी 9वाजता श्री के डी चौधरी सर यांचे काला कीर्तन होऊन त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दि.14 डिसेंबर 2025 रोजी गुणी विद्यार्थी व गुणिजनाचा गौरव करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व समाजबांधवांनी माहिती लक्षात घेऊन कार्यक्रमाला येण्याचे त्यांनी आवाहन केले.भाविकांनी कीर्तनाचा व कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.सर्वांचे आभार मानून समस्त समाज बांधवांना व संताजी भक्ताना या निमित्त शुभेच्छा दिल्या.
