चोपडा महाविद्यालयातील मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला ५ लाख १० हजार रुपयांची आर्थिक मदत
चोपडा,दि.६(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी स्वर्गीय दिपक तुकाराम पाटील यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांचे वडील तुकाराम पाटील व मेव्हणे हरीश गुजर यांना महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ऍड. संदीप पाटील, सचिव मा. डॉ. सौ. स्मिताताई पाटील व गंगाधर सूर्यवंशी यांच्या हस्ते ५ लाख १० हजार रुपयाचा धनादेश वितरीत करण्यात आला.
याप्रसंगी प्र. प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, प्र. रजिस्ट्रार डी. एम. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य पी. एस. पाडवी, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, मनीष देसले, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार, सहा. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आर. आर. पाटील, व्यवस्थापन शाखेचे विभाग प्रमुख डॉ. ए. एच. साळुंखे, घनश्याम पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थी दिपक पाटील याचा दि. २९ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता वढोदा शिवारात विजेचा शॉक लागून अपघाती मृत्यू झाला होता.
महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागातर्फे ओरिएंटल विमा कंपनीकडे क्लेम करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत विद्यार्थी सामूहिक सुरक्षा अपघात मृत्यू विमा योजनेच्या माध्यमातून ओरिएंटल विमा कंपनीकडून ५ लाख रुपये व मा. कुलगुरू महोदय यांच्याकडून १० हजार रुपये अशी एकत्रित रक्कम ५ लाख १० हजार रुपये विम्याची रक्कम महाविद्यालयास प्राप्त झाली होती.
या योजनेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचा विद्यापीठामार्फत विमा काढला जातो.
मृत विद्यार्थ्याचे गाव वढोदा ता. चोपडा असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. आता विद्यार्थ्याच्या कुटुंबात वडील, आई व एक विवाहीत बहीण आहे. विद्यापीठातर्फे सदर रक्कम दिल्याबद्दल कुटुंबाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग, ओरिएंटल विमा कंपनी व महाविद्यालयाचे आभार मानले आहे.
विमा क्लेमसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, सर्व उपप्राचार्य, समन्वयक, प्रभारी रजिस्ट्रार, व्यवस्थापन शाखेचे विभाग प्रमुख डॉ. अभिजीत साळुंखे, घनश्याम पटेल, कार्यालय विभाग तसेच वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करणारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, मच्छिंद्र पाटील, तांत्रिक सहा. अनुराग पाटील व क्लेम लवकर पूर्ण करून अनुदान वितरित केल्याबद्दल ओरिएंटल विमा कंपनी या सर्वांचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी याप्रसंगी आभार व्यक्त केले.
