पाडळसा आरोग्य केंद्रात सुपोषित जळगांव कार्यक्रम साजरा

 

पाडळसा आरोग्य केंद्रात सुपोषित जळगांव कार्यक्रम साजरा

अमळनेर दि.६(प्रतिनिधी)आज दिनांक - 06/12/2025 शनिवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसा अंतर्गत अंजाळे उपकेंद्र अंतर्गत वाघळुद येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सो.मिनल करनवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून सुपोषित जळगाव या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तथा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.राजू तडवी यांच्या आदेशानुसार..

प्रा.आ.केंद्र-पाडळसाचे.. वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीम.प्राजक्ता चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार वाघळुद येथील गावात जि.प.मराठी शाळे मध्ये शुगर बोर्ड बाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले., मोहिमेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली, यावेळी गावातील नागरिक तसेच.. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सौ.धनश्री बडगुजर, आरोग्य सहाय्यक-हितेंद्र पाटील, विजय देशमुख, स्वप्नील भालेराव, आरोग्य सेविका-श्रीम.ज्योती सपकाळे,आरोग्य सेवक-भरत धांडे, आशा सेविका-सौ.रुपाली पाटील, अंगणवाडी सेविका सौ.मनीषा पाटील,गावातील प्रतिष्ठित नागरिक आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने