चोपडा महाविद्यालयात ‘शरभंग’वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन

 चोपडा महाविद्यालयात ‘शरभंग’वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन

चोपडा,दि.८(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात ‘शरभंग’ या वार्षिक नियतकालिकाचा ५५ व्या अंकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश पाटील तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी.एस.पाडवी, पर्यवेक्षक ए.एन.बोरसे आदि उपस्थित होते.

   महाविद्यालयाच्या 'शरभंग' या नियतकालिकाच्या मुखपृष्ठाला, मांडणीला तसेच विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील लेख व कविता यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या नियतकालिक अंक स्पर्धेत पारितोषिके प्राप्त झाली आहेत. 'शरभंग' या नियतकालिकातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ प्राप्त करून दिले जाते. यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभा शक्तीला प्रेरणा देण्याचे कार्य या माध्यमातून केले जाते. 

   याप्रसंगी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश पाटील तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शरभंग समिती संपादक डॉ.एम.एल.भुसारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.डी.डी.कर्दपवार, शरभंग नियतकालिक संपादक मंडळ सदस्य डॉ.के.एस.भावसार, व्ही.डी.शिंदे, एन.बी.पाटील तसेच एस.जी.पाटील व विशाल खैरनार यांनी परिश्रम घेतले.   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने