दत्त जयंती निमित्त गणपुर येथे दत्त पादुका व विशेष ची मिरवणूक
गणपूर,ता चोपडा दि. 4 (चोपडा प्रतिनिधी): येथे आज दिवसभर दत्त जयंती व पौर्णिमेनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील न्यू प्लॉट भागात असलेल्या दत्त मंदिरात दुपारी हेमंत पाटील यांच्या आर्थिक सहकार्याने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्त प्रसाद वाटप करण्यात आले. दिवसभर दत्त मंदिरात महानुभाव पंथीय व गावकऱ्यांनी मंदिरात जाऊन दत्तमूर्ती व विशेष चे दर्शन घेतले.सायंकाळी दत्त पादुका व मूर्ती असलेल्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली,यावेळी गावभर रांगोळी काढण्यात आली होती.पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला व पुरुष भाविक सहभागी झाले होते.
