राज्य जनगनणा निदेशलायाच्या संचालिका डॉ . निरुपमा डांगे यांच्या उपस्थितीत चोपड्यात घरयादी व घर गणना पूर्वचाचणी प्रशिक्षण
चोपडा दि.६(प्रतिनिधी)आज दिनांक ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी, चोपाडा, जळगाव, महाराष्ट्र येथे घरयादी व घरगणना पूर्वचाचणी (एचएलओ) साठी चे प्रगणक आणि पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ निरुपमा डांगे, संचालक (भा. प्र. से .) जनागनणा निदेशलाय महाराष्ट्र मुंबई यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यामध्ये घरयादी व घरगणना पूर्वचाचणी (एचएलओ) याबाबत सविस्तर माहिती देतांना २०२७ ची होणारी जनगणना ही डिजिटल स्वरूपाची असेल, त्यासाठी महाराष्ट्र मध्ये तीन ठिकाणी पूर्व चाचणी घेण्यात येणार आहे त्यामध्ये चोपडा तालुक्यातील २६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्व चाचणी मध्ये येण्याऱ्या समस्या, अडचणी, अँप कशा प्रकारे कार्य करते या सर्वांची अभ्यास पूर्ण माहिती जनगणना २०२७ साठी तपासली जाणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रम च्या वेळी तहसीलदार तथा चार्ज अधिकारी श्री. भाऊसाहेब थोरात, श्री. वीरेंद्र दीक्षित, सह -संचालक, श्री. सागर बागुल, उप संचालक, श्री. अजय ठाकूर, सहाय्य्क संचालक, तथा जनगणना अधिकारी, श्री. संजय नाईक, श्री. विशाल दिवेकर, श्री. श्रीकांत बनकर , श्री. मयूर पवार , श्री. प्रणय कडू , श्री. आशिष यादव, श्री. प्रदीप सिंग, श्री. प्रणय कडुकर, तसेच चोपडा तहसीलचे अधिकारी निवासी नायब तहसीलदार श्री. योगेश पाटील श्रीमती वंदना दाभाडे अव्वल कारकून, श्री. किशोर ठाकरे व कर्मचारी या वेळी उपस्थित होते...
