सामाजिक कार्यकर्ते श्री प्रफुल महेंद्र स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपड्यात रक्तदान शिबिर संपन्न.. उद्घाटन हस्ते माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी
चोपडा दि.२०(प्रतिनिधी): एचडीएफसी बँक चोपडा व अंमळनेर शाखा आणि पप्पू स्वामी मित्र मंडळ यांच्यातर्फे सामाजिक कार्यकर्ते श्री प्रफुल महेंद्र स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपड्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष श्री अरुणभाई गुजराथी यांच्या शुभहस्ते तर चोपडा पीपल को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन श्री चंद्रहासभाई गुजराथी, एचडीएफसी बँकचे मॅनेजर श्री अतुल पाटील, श्री संचित पाटील यांच्या खास उपस्थितीत पार पडले.यावेळी 33 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पप्पु स्वामी मित्र मंडळ, गोविंदा नवाल,मयूर बाविस्कर, जगदीश माळी,नितीन पाटील, सुनील पाटील, किरण सुरेश पाटील,मयुर पाटील,किरण पन्नालाल पाटील, श्रेणिक जैन, प्रफुल्ल पाटील,राहुल कावीरे, निलेश भादले, सचिन बैसाने,परेश लोहार,भूपेंद्र माळी परिश्रम घेतले.
