चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीतून आज तिघांची माघार .. कोणत्या प्रभागातून कोण मागे वाचा सविस्तर
चोपडा दि.20(प्रतिनिधी)चोपडा नगर परिषद निवडणुकीत साठी वैद्यरित्या नामनिर्देशित सदस्य पदाच्या उमेदवारांमधून काही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज काही वार्डातून माघार घेण्यास सुरुवात केली असून आज तीन उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे
यंदाच्या निवडणुकीत नामांकन अर्जांच्या म्हणजेच उमेदवारी दाखल अर्जांचा जोरदार पाऊस पडला असून त्यात आता काही उमेदवारांनी काही अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक १० ब मधून राजाराम भावलाल गुजर (रा. गुजरवाडी )तर 11 अ प्रभागातून सीमा राजेंद्र गुजर( रा. गुजरवाडी) तर प्रभाग क्रमांक 5 अ मधून नसरीन बानो शेख तय्यब बागवान अशा तीन उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यां मार्फत कळविण्यात आली आहे. माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक जण आपला अर्ज मागे घेतील अशी शक्यता राजकीय धुरंधरांनी वर्तविली आहे.
