जिल्हाधिकारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जनसाहस यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जणांची सोडवणूक
जळगांव,दि.२०(प्रतिनिधी) | जळगांव जिल्ह्यातील जळगांव व धरणगाव तालुक्यासह एकूण 31 ऊसतोड मजुरांना बीड मधुन सुटका करण्यात आली आहे. तालुका माजलगाव, कवाडगाव थळी परिसरात मुकादम बाळू मगरे, मालक सोमेश्वर पाटील, गणेश सोमेश्वर पाटील यांच्या ताब्यात डांबून ठेवण्यात आलेल्या या मजुरांची मुक्तता जळगांव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडअधिकारी रोहन घुगे व जन साहस फाउंडेशनच्या पुढाकाराने करण्यात आली.“8 तास काम मिळेल” असे सांगून मजुरांना बीड जिल्ह्यातील कवाडगाव थळी येथे नेण्यात आले होते. मात्र वास्तवात त्यांच्याकडून 15 ते 18 तास जबरदस्तीने काम करून घेतले जात होते, तसेच परत जाण्यास मजुरांना त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. कामाचा मोबदला न देता, अन्न-पाण्याविना ठेवून मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती.
या प्रकाराविरोधात तक्रारदार सुशीलाबाई रवींद्र सोनवणे व मंजुबाई शांताराम सोनवणे यांनी जन साहस कामगार हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर जन साहस संस्थेच्या जिल्हा समन्वयक निलेश शिंदे व क्षेत्र अधिकारी सोनम बिऱ्हाडे यांनी तातडीने जळगांव मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंड अधिकारी रोहन घुगे साहेब यांची भेट घेऊन कामगारांना मुक्तता करण्यासाठी विनंती अर्ज देण्यात आला व कार्यवाही करण्यासाठी विनंती केली. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंड अधिकारी रोहन घुगे साहेब यांनी मा. साहाय्य कामगार आयुक्त आर. आर. घुल्हाने साहेब जळगांव विभागाला तात्काळ आदेश दिल्यानंतर बीड प्रशासनाशी समन्वय करून बचाव मोहिम राबविण्यात आली.
या कारवाईत जन साहस फाउंडेशन, जळगांव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड (ग्रामीण) पोलीस स्टेशन कार्यालय माजलगाव तहसील कार्यालय प्रशासन माजलगाव यांसह संबंधित विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविला.सुटलेल्या मजुरांना माजलगाव तहसील कार्यालयात आणून पंचनामा करण्यात आला रिलीझ सर्टिफिकेट देण्यात आले व माजलगाव ग्रामीण पोलीस येथे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला
सर्व नागरिक या आदिवासी समाजाचे असून त्यांच्याकडून गत तीन महिन्यापासून बळजबरीने काम करून घेतल्या जात होते मारहाण व धमकी देत होते अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केल्यानंतर न्या आनंद यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड मा.जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब बीड व न्या. वाहब सय्यद सचिव जिल्हा विधिसेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली 31 कामगारांची सुटका करण्यात आली.
यावेळी गौरव इंगोले उपविभागीय अधिकारी माजलगाव संतोष रुईकर तहसीलदार माजलगाव , बालक कोळी पोलीस निरीक्षक माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन साहाय्य कामगार विभागाचे राम आदमाने तालुका व्यवस्थापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच जन साहस फॉउंडेशन जळगांव जिल्हा समन्वयक निलेश शिंदे क्षेत्र अधिकारी सोनम बिऱ्हाडे अँड. वीरसेन काजळे धाराशिव जिल्हा समन्वयक साधना गायकवाड व क्षेत्र अधिकारी उमाजी गायकवाड विक्रम कल्याणकर उपस्थित होते. सर्व कामगारांची जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी भेट घेतली त्यांची समस्या जाणून घेतली व त्यांना शासकीय योजना विषयी माहिती दिली मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील यासाठीची माहिती दिली. तसेच सर्व कामगार जळगाव जिल्ह्यातील असल्यामुळे तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून मुलांना शिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल असे त्यांनी सांगितले
तसेच न्या. वाहब सय्यद यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्याशी संपर्क साधून या सर्व कामगारांना कायदेविषयक मोफत मधून मिळवून देण्याचे आश्वासित करण्यात आले
त्यानंतर मजुरांना जळगांव मा. जिल्हा अधिकारी रोहन घुगे साहेब यांच्या कार्यालयात भेट घेण्यात आली व कामगारांना मुलांच्या शिक्षणा बद्दल व मनरेगा योजना व पुर्वासन बद्दल मार्गदर्शन केले. तसेच मा. पवन बनसोड साहेब जिल्हा सचिव विधी सेवा प्राधिकरण जळगांव येथे हजर करून कायदेशीर मदत व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व कामगारांनी प्रशासनाचे आभार मानले व त्या नंतर जळगांव जन साहस अधिकाऱ्यांनी मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविण्यात आले.
