ठिबक/तुषार सिंचन: हरभरा पिकास वरदान

 ठिबक/तुषार सिंचन: हरभरा पिकास वरदान




ब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या पिकापैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पिक आहे. या पिकाचे शेती आणि मानवी आहारात अनन्य साधारण असे महत्व आहे. महाराष्ट्र राज्यातील गेल्या दोन-अडीच दशकामधील हरभरा लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता याचे अवलोकन केले असता, यामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते.


हरभरा पिकास ठिबक/तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पिक पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास ठिबक/ तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पध्दत आहे. ठिबक/तुषार सिंचन पध्दतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा ठिबक/तुषार सिंचन पध्दतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नेहमीच्या पध्दतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुजसारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. परंतु ठिबक /तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मुळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.


श्री. हर्षल ज्ञानेश्वर पाटील

संशोधन आणि विकास विभाग 

इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने