चोपडा शहराला आधुनिक, समृद्ध आणि विकसित शहर बघावयाचे असल्यास भाजपा राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांना निवडून आणा..आ.मंगेश चव्हाण
चोपडा दि.२९(प्रतिनिधी): चोपडा शहराला आधुनिक, समृद्ध आणि विकसित शहर म्हणून घडवण्याचा प्रयत्न भाजपा राष्ट्रवादी युती करणार आहे. हा निर्धार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी येत्या २ तारखेला युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणे आपली जबाबदारी आहे, त्यामुळे जोमाने कामाला लागण्याचे आवाहन आमदार मंगेश रमेश चव्हाण यावेळी केले.
या महामेळाव्याला माजी आमदार श्री. कैलास बापू पाटील, पणन महासंघाचे संचालक श्री. रोहित दादा निकम यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. साधना नितीन चौधरी, आणि सर्व अधिकृत नगरसेवक उमेदवार, चोपडा तालुका पूर्व-पश्चिम व शहर मंडळातील सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चोपडा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी युतीचा भव्य कार्यकर्ता - पदाधिकारी महामेळावा समर्थ पॅलेस चोपडा येथे संपन्न झाला.
