शिवसेना शिंदे गटांच्या अधिकृत उमेदवार सौ.दीपालीताई विनोद चव्हाण यांचा प्रचारात झंझावात.‌. प्रभाग क्रमांक ६ मध्ये वृद्ध आजी बाबांनी दिला "विजयी भव्" चा आशिर्वाद

 शिवसेना शिंदे गटांच्या अधिकृत उमेदवार सौ.दीपालीताई विनोद चव्हाण यांचा प्रचारात झंझावात.‌. प्रभाग क्रमांक ६ मध्ये वृद्ध आजी बाबांनी दिला "विजयी भव्" चा आशिर्वाद 


चोपडादि.२५(प्रतिनिधी) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६  "अ" गटातील  शिवसेना  (शिंदे) गटाचे अधिकृत उमेदवार सौ. दिपाली विनोद चव्हाण व ६" ब"चे उमेदवार आसिफ सिद्दकी यांनी आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी होम टू होम घरोघरी जाऊन आजी बाबांचा आशीर्वाद घेऊन मतदारांचे स्नेहबंधांचे जाळे विनण्याचे काम करून आख्खा परिवाराच आपला केल्याचे चित्र आज पहायला मिळाले. गृह सखींनी तर आम्ही शिव धनुष्यच हाती घेतल्याची ग्वाही देत आपला विजय पक्का असल्याची खात्री दोन्ही उमेदवारांनी दिली .ना मुस्लिम, ना हिंदू ,हम सब एक है , प्रचिती देत एकतेची झलक  दाखवत मतदार राजांनी विजयाची पक्की खात्री दिली आहे.

 आ.चंद्रकांत सोनवणे यांचे चोपडा शहर बदलाचे व्हिजन लक्षात घेऊनशिवसेना कॉंग्रेस आघाडी चे  नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. नम्रता सचिन पाटील, प्रभाग क्र.६ च्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ.दीपाली विनोद चव्हाण व उमेदवार आसिफ सिद्दकी यांना प्रचंड मतांनी निवडून आणावे अशी विनंती प्रभाग वासियांना उमेदवारांनी केली. या विनंतीला परिसरातील महिला व वृद्ध आजी बाबांनी जोरदार प्रतिसाद देत आमचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे .विजयी भव..! म्हणत यश तुमच्या नशीबी असल्याचे सांगून ह्रदयस्पर्शी बोल ऐकावयास मिळाले.

 प्रभाग क्रमांक ६ आशा टाकी परिसर, परदेशी गल्ली,मराठे गल्ली भाट गल्ली  आदि भागात प्रचाराला जनतेकडून उस्फुर्त प्रतिसाद  मिळाला.या रॅलीत सय्यद मजहर सय्यद जहांगीर, शेख साबीर शेख ,सुरेश बापू,सौ.लीना मनोज बडगुजर, सौ. निकिता रविंद्र बडगुजर, सौ.सुरेखा मोहन बडगुजर सौ.कल्याणी योगेश बडगुजर , श्री.प्रथमेश चव्हाण, श्री मिलिंद रमाकांत बडगुजर ,श्री सागर किशोर बडगुजर ,श्री मनोज जगदीश बडगुजर, श्री रविंद्र भिका बडगुजर ,श्री जयेश मोहन बडगुजर,  सिद्दीक गोरख कोळी ,सचिन कोळी, आरिफ सिद्ध की व्यापारी कालूदादा शे ख, अल्ताफ शेख सय्यद अहमद अली मुनाफ येलेकर , युनूस सय्यद, युसुफ खान, मोईन शेख, नदीम शेख साबीर, कलीम शेख, असलम शेख, साहिल शे ख, सलाम शेख, मंजूअली सय्यद, मोबीन शेख मुस्तफा, दीपक महाजन, स्वाती बडगुजर, सविता पाटील, जुबेर शेख, तोफिक शेख, अरमान खाटीक, गफार सय्यद, श्री निलेश अरुण बडगुजर ,श्री संदीप जगदीश बडगुजर, श्री राजेंद्र पुंडलिक बडगुजर, श्री प्रशांत मगन बडगुजर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने