चोपडा तालुक्यातील युवकांचा शिरपुर तालुक्यात अपघातात मृत्यू..
चोपडा,दि.६(प्रतिनिधी) तालुक्यातील कुंड्या पाणी या आदिवासी पाड्यावरील तरुणाचा दि. 06/11/2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील लकड्या हनुमान गावाजवळ अपघात होऊन दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली
याबाबत कुंड्या पाणी या पाड्यावरील युवक प्रविन भिमसिंग बारेला वय-20 हा आपल्या मोटरसायकलने मोटर जात असताना शिरपूर तालुक्यातील लकडे हनुमान गावाजवळ मोटार सायकलला अपघात होऊन जबर जखमी झाला त्यास शिरपूर शासकीय रुग्णालयात दाखल केला असता उपचारात दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत वार्डबाँय गणेश बेंडवाल (नेम कॉटेज हॉस्पीटल शिरपुर )यांनी डॉ हिरेन पवार यांच्या आदेशाने फोनद्वारे कळविले की मयत नामे प्रविन भिमसिंग बारेला वय-20 वर्षे रा. कुंडयापाणी ता. चोपडा जि. जळगाव हा रोहीणी गावाकडुन लाकड्या हनुमान गावाकडे त्याच्या ताब्यातील मोटार सायकलने येत असंताना रोहीणी गावाच्या 1 कि.मी अंतरावर रोडच्या कडेस मोटार सायकलचा अपघात झाल्याने तो तेथे दुखापती अवस्थेत असल्याने त्यास उपचारकामी कॉटेज हॉस्पीटल शिरपुर येथे पोकाँ प्रकाश भिल यांनी दाखल केले असता डाँक्टर हिरेन पवार यांनी मयत घोषीत केले आहे. पुढील पीएसआय वसावे हे करीत आहेत.
