आरक्षण सोडत बाबत निवडणूक आयोगाचे मोठ्ठे अपडेट्स..! जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणविषयी जाणून घ्या.स्टेप बाय स्टेप तारखा ..३ नोव्हेंबर रोजी होणार अंतिम आरक्षण जाहीर

 

 आरक्षण सोडत बाबत निवडणूक आयोगाचे मोठ्ठे अपडेट्स..!
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणविषयी  जाणून घ्या.स्टेप बाय स्टेप  तारखा ..३ नोव्हेंबर रोजी होणार अंतिम आरक्षण जाहीर


चोपडा दि.1(प्रतिनिधी): डिसेंबर २०२५ नंतर होऊ घातलेल्या राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आरक्षणसाठी विचार विनिमय सोडत सभा   दिनांक 9 /10/2025 रोजी राज्यभर बैठकींचा सिलसिला जारी झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या 6 /5/ 2025 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समितीचे सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमासाठी सदस्य संख्या निश्चित करण्यात आल्याने प्रभाग रचनेच्या कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या अंतर्गत अंतिम प्रभाग रचना 22/ 8/ 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आता निवडणुकी करता सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्याबाबतचे कार्यक्रम घेण्यात येत आहे त्यानुसार जिल्हा परिषदा व पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण निश्चिती बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत त्यासाठी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी विहित कालावधीत आरक्षण अंतिम करण्याबाबत कार्यवाही करावी असा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी एका पत्रकान्वये दिला आहे
त्यानुसार प्रारूप आरक्षणाकरिता अनुसूचित जाती जमाती जागा निश्चित करण्याकरता विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांकडे दिनांक 6/10/2025 पर्यंत जिल्हाधिकारी यांना सादर करावयाचे आहे त्यानंतर 8/10/ 2025 रोजी अनुसूचित जाती जमाती राखीव जागांच्या प्रस्ताव विभागीय आयुक्त मान्यता देतील. दिनांक 10/10/2025 रोजी जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करतील. त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला अनुसूचित जाती जमाती व नागरिकांच्या मागासवर्गातील सर्वसाधारण महिला राखीव बाबत विषय असेल .दिनांक 13 /10 /२०२५ रोजी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिला अनुसूचित जाती जमाती यांच्याकरता  जिल्हा परिषदेसाठी  जिल्हाधिकारी  यांच्याकडे तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी तहसीलदारांकडे सुनावणी होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.14/10/2025 रोजी जिल्हाधिकारी  प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करतील.
*हरकतीसाठी कालावधी*

  दिनांक 14/ 10 /2025 ते 17/ 10 /2025 दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करता येणार आहे.त्यानंतर
27/ 10 /2025 रोजी जिल्हाधिकारी प्रारूप आरक्षण वरील हरकती व सूचनांचे आधारे अभिप्रायास गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करतील त्या  प्रारूप आरक्षणावर हरकती  व सूचनांचा विचार करून विभागीय आयुक्त दि.31/10/2025 रोजी आरक्षणाला अंतिम स्वरूप देतील.त्यानंतर  जिल्हाधिकारी 03/11 /2025 रोजी पर्यंत अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करतील असेही निवडणूक आयोगाचे सचिव श्री.काकाणी यांनी पत्रकातून स्पष्ट केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने