जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ९ ऑक्टोबर रोजी जि.प.व पंस.निवडणूकीसाठी आरक्षण नियोजनासाठी महाबैठक
चोपडा दि.१(प्रतिनिधी) : दिनांक 17 सप्टेंबर 2025 च्या अधिसूचनेद्वारे जळगांव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांचे साठी सोडत पध्दतीने आरक्षित करावयाचे आहे. सोडत सभा दिनांक 9/10/2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार जळगांव येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रातील ज्या नागरीकांना सदर सभेस उपस्थित राहण्याची इच्छा आहे त्यांनी सदर ठिकाणी विहीत दिनांकास व वेळेस उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
