पंकज माध्यमिक विद्यालयात प्रांताधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांचे हस्ते 251 दाखल्यांचे वाटप.. ♦️सेवा पंधरवडा निमित्त शासकीय योजनांची प्रशंसनीय अंमलबजावणी चोपड्यात

 

पंकज माध्यमिक विद्यालयात प्रांताधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांचे हस्ते  251 दाखल्यांचे वाटप..

♦️सेवा पंधरवडा निमित्त शासकीय योजनांची प्रशंसनीय अंमलबजावणी चोपड्यात

चोपडा दि.२(प्रतिनिधी) : - येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  सेवा पंधरवडा निमित्त अमळनेर भागचे प्रांताधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांच्या शुभहस्ते हस्ते इयत्ता 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ एस पी बोरोले, संस्थाध्यक्ष पंकजभैया बोरोले उपस्थित होते.

सेवा पंधरवडा निमित्त विद्यालयात डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, इनकम सर्टिफिकेट, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट असे विविध सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी सहज प्राप्त होण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सूचित केले त्यानुसार संस्थापक अध्यक्ष डॉ एस पी बोरोले व अध्यक्ष पंकजभैय्या बोरोले यांनी विद्यालयात कॅम्प आयोजनासाठी प्रेरित करत मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने 2 दिवसात 251 विविध दाखल्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आणि इ सेवा केंद्र समन्वयक नरेश बारेला यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. सदर सर्व दाखले तहसील कार्यालयातील पदाधिकारी यांनी  तहसीलदार  यांच्या प्रेरणेने व तत्परतेने तयार करून कमीत कमी वेळात विद्यार्थी व पालकांना सहज उपलब्ध करून दिले. विविध दाखले वितरण प्रसंगी  प्रांताधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांनी 251 दाखल्यांचे वितरण कमी कालावधीत उत्तम नियोजनबद्ध पणे केल्याबद्दल विद्यालयाचे तसेच सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याचे कौतुक केले. कोणताही दाखला मिळविण्यासाठी भरपूर कागदपत्रे जमा करणे पासून सर्टिफिकेट मिळेपर्यंत काय अडचणी येतात हे पालकांना होणाऱ्या त्रासातुन  मुक्तता या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यालयाने व तहसील कार्यालयाने केली असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी विद्यालयात सुरू असलेल्या आधार अपडेट कॅम्प ला त्यांनी भेट देऊन विद्यालयात सेवा पंधरवडा निमित्त सुरू असलेल्या विविध उपक्रमांबद्दल गौरवोद्गार काढले. संस्थापक अध्यक्ष डॉ एस पी बोरोले यांनी शाळा ही  पालक व विद्यार्थी हित जोपासण्यासाठी नेहमी तत्पर असते व शासनाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत  पोहोचविण्यासाठी आवश्यक इंटरनेट सह सर्व सुविधा उपलब्ध करून देत असते , त्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी अहोरात्र झटत असतो असे सांगितले.

कार्यक्रम ची सुरवात बी एम तायडे सर यांच्या सुमधुर इशस्तवन ने झाली प्रास्ताविकात मुख्याध्यापक व्ही आर पाटील यांनी सेवा पंधरवडा निमित्त विद्यालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयातील सर्कल मनोज साळुंखे सह तलाठी व इतर पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन आर वाघ यांनी केले तर सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम नियोजन साठी परिश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने