सौ. सु. गी पाटील विद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न

 सौ. सु. गी पाटील विद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न



भडगावदि.४(प्रतिनिधी): येथील सौ सुमनताई गिरिधर पाटील माध्य. सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्य. व्यव. अभ्यासक्रम तसेच जिजाऊ प्राथमिक विद्यालय या सर्व विभागांची पालक शिक्षक सभा नुकतीच संपन्न झाली. 

सभेच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक/प्राचार्य अजयजी अहिरे उपस्थित होते तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक आर बी पाटील, उप प्राचार्य एस एम सोनवणे, पर्यवेक्षिका सी व्हि बिऱ्हाडे, पर्यवेक्षक एस एस महाजन , डॉ. पल्लवी पाटील उपस्थित होते. सभेला दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली.  उपस्थित पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजयजी अहिरे यांनी केले तर इतिवृत वाचन सभेचे सचिव प्रा. एल के वाणी यांनी केले, गेल्या शैक्षणिक वर्षाचा मागोवा मुख्याध्यापक व पर्यवेक्षिका छाया बिऱ्हाडे यांनी सांगितला व भविष्यातील राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती दिली. पालकांनी उत्तम शालेय प्रशासन, गुणात्मक विकास व शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात गुणसंपादन केल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी एन एन एम एस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तिलक जडे चा सत्कार, हुशु स्पर्धेत नाशिक विभागीय स्पर्धेत प्रतिक दाभाडे १९ वर्ष वयोगटात सर्वप्रथम निवड झाल्याने सत्कार व यापुढील राज्यस्तरावर पात्र  छत्रपती संभाजीनगर येथे .  मनोगतातून शरद महाजन, संदीप सोनवणे, छाया बिऱ्हाडे, डॉ.पल्लवी पाटील , प्रा.अतुल देशमुख यांनी शालेय योजनांचा आढावा घेतला व १० वी,१२ वी सर्वप्रथम विद्यार्थी व एकूण निकालाची परंपरा याविषयी ऊहापोह केला.पालक शिक्षक संघाची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष मुख्याध्यापक अजयजी अहिरे, उपाध्यक्ष डॉ. पल्लवी पाटील, सचिव प्रा. एल के वाणी,सहसचिव गजानन सोनजे व शासन धोरणाप्रमाणे सदस्य निवड करण्यात आली. सभा अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेचे सूत्रसंचालन प्रा. शरद डी पाटील यांनी तर उपमुखाध्यापक आर बी पाटील यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने