पंकज माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी साई सोनवणे (शेटे) याने तब्बल 68 चेंडूत 103 धावांची खेळी
चोपडा दि.४(प्रतिनिधी) :- तालुक्यातील अडावद येथील रहिवासी व चोपडा पंकज माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी साई सोनवणे (शेटे) याने जळगाव जिल्ह्या अंडर-14 क्रिकेट संघाचा सिलेक्शन मॅचेस मध्ये 68 चेंडूत 103 धावांची खेळी करून आपल्या विद्यालयाचे नाव जिल्हा संघात कोरले असून, हा विद्यालयासाठी अभिमानाचा क्षण आहे.
शेटे परीवाराकडुन विषेश अभिनंदन
103 धावांची नेत्रदिपक खेळी करणाऱ्या चि. साई व त्याच्या, पालकांचे आणि चि. साई ला क्रिकेट चे धडे देणारे मार्गदर्शक अजय सैंदाने सरांचे चोपडा पंकज माध्यमिक विद्यालयाचा वतीने विषेश अभिनंदन करण्यात येत आहे. चि.साई सोनवणे (शेटे) रा.अडावद हा चोपडा बस आगारातील वाहक संजय सोनवणे यांचा पुतण्या असुन त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन व होत आहे.
