स्वच्छ भारत दिवस उपक्रमांतर्गत प्रताप विद्या मंदिरात एनसीसी विभागामार्फत विविध उपक्रम

 स्वच्छ भारत दिवस उपक्रमांतर्गत प्रताप विद्या मंदिरात एनसीसी विभागामार्फत विविध उपक्रम 

    चोपडा दि.४( प्रतिनिधी):  प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे एनसीसी विभाग मार्फत स्वच्छ भारत दिवस निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रभातफेरी, प्लास्टिक फ्री भारत चित्रकला स्पर्धा, इत्यादीचा समावेश करण्यात आला.

        त्यात सुरुवातीस सकाळी सर्व एनसीसी कॅडेट्स व एनसीसी अधिकारी यांच्या मार्फत गणेश कॉलनी परिसरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर प्लास्टिक फ्री भारत म्हणून प्लास्टिकचा वापर टाळून  कागदी पिशव्यांचा वापर वाढावा या उद्देशाने विद्यार्थ्यांनी स्वतः कागदी पिशव्या तयार केल्या. त्या कागदी पिशव्यांचे वाटप बाजारातील दुकानदारांना करण्यात आले. पर्यावरणपूरक साहित्याचे निर्मिती आणि वापर  हा  संदेश  समाजाला यातून दिला गेला. तसेच पर्यावरण संरक्षण या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

           चोपड्याच्या मुख्य बाजारपेठेतून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.चोपडा येथील न्यायालयाच्या आवारात कॅडेट्स आणि नागरिकांच्या मदतीने स्वच्छता करण्यात आली.   सदर उपक्रमांना प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत गुजराथी, उपमुख्याध्यापिका माधुरी पाटील यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमांसाठी एन सी सी अधिकारी रोहन पाटील सर व जयश्री बडगुजर  यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने