मानवतेचा व सेवेचा सत्कार : अरुणभाई गुजराथी..चहार्डी येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय सोनवणे सेवानिवृत्त
चोपडा,दि.५(प्रतिनिधी) : तालुक्यातील चहार्डी येथील चहाडे विद्या प्रसारक शिक्षण मंडळाच्या भाऊसाहेब कैलासवासी शामराव शिवराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक श्री विजय रामदास सोनवणे हे 30 सप्टेंबर रोजी त्यांच्या 33 वर्षाचा प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा चहार्डी विद्या प्रसारक मंडळ व मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते तर प्रमुख पाहुणे माजी आमदार तथा चेअरमन तापी सहकारी सूतगिरणी चे चेअरमन कैलास पाटील जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष इंदिराताई पाटील चहार्डी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सुरेश शामराव पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ पराग पाटील सचिव प्रकाश पाटील, संचालक जी टी पाटील सरपंच चंद्रकलाबाई पाटील, ग्रा.प च्या माजी सदस्य कमलाबाई रामदास सोनवणे व ग . स. चे संचालक मंगेश भोईटे, योगेश सनेर आदी प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.या सर्व मान्यवरांचा हस्ते विजय सोनवणे व त्यांच्या पत्नी मीनाक्षी सोनवणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ही सोनवणे यांचा सत्कार केला.
यावेळेस विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी विजय सोनवणे यांच्या विषयी बोलताना सांगितले की, हा मानवतेचा व सेवेचा सत्कार असून आपण केलेल्या कामाची पावती असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. विद्यालयाची भरभराट करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांनीही विजय सोनवणे यांना कायम स्वातंत्र्य दिले म्हणूनच ते तालुक्यात एक उत्कृष्ट शैक्षणिक दालन उभे करू शकले असेही यावेळेस अरुणभाई गुजराथी म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील म्हणाले की,श्री सोनवणे यांचे अकुलखेडा व चुंचाळे येथील शैक्षणिक काम पाहून चहार्डी येथील मुख्य कार्यालय असलेल्या शाळेत संचालकांच्या संमतीने संधी देऊन पूर्णपणे काम करण्यास स्वातंत्र्य दिले.उत्तरोत्तर अशी शाळेची प्रगती होऊ शकली. माजी आमदार कैलास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालक जी. टी. पाटील, राज्य पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापक खंडेराव रामदास बाविस्कर, बहादरपूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक कालिदास सहादू मोरे,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त माध्यमिक शिक्षक संजय सोनवणे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन श्री पी. एस. अहिरे यांनी केले.

