उत्तमनगर येथे बालविवाह आणि व्यसनमुक्ती मोहीम
चोपडा दि.५(प्रतिनिधी) : समाजकार्य महाविद्यालय आणि उत्तमनगर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने उत्तम नगर (ता.चोपडा) येथे दि. 04/10/2025 शनिवार रोजी समाजकार्य महाविद्यालयातील एम. एस. डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी "बालविवाह निर्मूलन" आणि "व्यसनमुक्ती" या अत्यंत महत्त्वपूर्ण समाजातील ज्वलंत समस्येवर प्रभावी जनजागृती मोहीम राबवली व घरोघरी जाऊन यांनी बालविवाह आणि व्यसनमुक्ती या विषयी गावकऱ्यांना माहिती दिली व समाजात जागरूकता घडवून आणण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप मोलाचे पाऊल या ठिकाणी उचलले व या मोहिमेमुळे समाजात नक्कीच जनजागृती होऊन गावकऱ्यांचे आरोग्य व शिक्षण यात नक्कीच प्रगती होईल. या मोहिमेसाठी मार्गदर्शन प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर सर व मोहीम आयोजनाचे नियोजन क्षेत्र कार्य पर्यवेक्षक उपप्राचार्य प्रा.डॉ.आशिष गुजराथी सर यांनी केले.
मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक शिक्षक उत्तमनगर गावाचे पोलीस पाटील तसेच उत्तमनगर क्षेत्र कार्य गटातील विद्यार्थी कल्याणी पाटील, रीना जाधव, अनिता पावरा, वंदना पावरा, चैताली पावरा, अंजली बारेला, यश माळी, प्रथमेश सोनवणे या सर्व विद्यार्थ्यांनी मोहीम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
