महाजन क्लासेस मार्फत विदर्भातील पुरग्रस्तांना साहित्य रवाना

 महाजन क्लासेस मार्फत विदर्भातील पुरग्रस्तांना साहित्य रवाना 

चोपडा,दि.६(प्रतिनिधी) शहरातील महाजन इंग्लिश क्लासेस मार्फत विदर्भात झालेल्या पुरग्रस्त नुकसानात रस्त्यावर आलेल्या  परिवारातील शाळकरी मुलांना व  महिलांना  वह्या पेन व साड्या अशा जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून पाठवण्यात आल्या आहेत. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एस बी नाना पाटील यांच्या  मार्गदर्शनात ही मदत रवाना करण्यात आली आहे.

निसर्गाच्या अस्मानी सुलतानी संकटाने अनेक कुटुंब विदर्भात  बेघर झाले आहेत प्रचंड नुकसानीने ते रस्त्यावर आले आहेत त्यांना अशा परिस्थितीत राज्यभरातून मदतीची नितांत गरज आहे. हे भीषण चित्र पाहून क्लासेसचे संचालक दीपक महाजन सरांनी मदतीसाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले असता बहुतांश विद्यार्थ्यांनी यथाशक्तीप्रमाणे  वह्या ,पेन, कपडे ,साड्या असे साहित्य जमा केले व ते साहित्य किसान काँग्रेसचे अध्यक्ष एस.बी.नाना पाटील यांच्या मार्गदर्शनात  रवाना करण्यात आले आहे. क्लासेस नेहमीच सेवाभावी कृत्यात सक्रिय होत असते त्यामुळे जनमानसात आपली छाप सोडत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने