नंदुरबार तालुका विधायक समितीचे श्री बटेसिंग भैय्या रघुवंशी यांचे विधी विद्यालयात राज्यघटना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विषयावरती व्याख्यान संपन्न
नंदुरबार,दि.७(प्रतिनिधी)येथील नंदुरबार तालुका विधायक समितीचे श्री. बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार या ठिकाणी आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ सोमवार रोजी राज्यशास्त्र अभ्यासक श्री. निलेश गद्रे यांचे राज्यघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.
सदर महाविद्यालयातील मुट कोर्ट हाॅलमध्ये आयोजीत व्याख्यानमालेत श्री निलेश गद्रे यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात राज्यघटना म्हणजे काय, राज्यघटनाची वैशिष्टे, राज्यघटना तयार करण्यासाठी बाबासाहेबांचे योगदान या विषयावरती विद्यार्थ्यांचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन डी चौधरी सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. किरण मराठे यांनी केले.तर यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.