शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्वच्छता अभियान,जनजागृती रॅली व पोस्टर प्रदर्शन
चोपडा दि.६(प्रतिनिधी)चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपडा तर्फे राष्ट्रपिता महात्मागांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबवत जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी कल्याण विभागामार्फत प्रा. डॉ.सविता जाधव यांनी विद्यार्थ्यांना पूर्वसुचना देऊन सदर रॅलीसाठी घोषवाक्य तसेच स्वच्छतेवर पोस्टर विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतले. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लालबाहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यां मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वच्छता अभियान पोहोचवण्यासाठी रॅलीचे आयोजन केले.
अरुणोदय कॉलनी, मालती हॉस्पिटल अरुण नगर या परिसरात विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून घोषवाक्य देत स्वच्छतेचा संदेश दिला. व प्रत्यक्ष स्वच्छता अभियान राबवत महाविद्यालयीन परिसर स्वच्छ केला. महाविद्यालय परिसरात जमा झालेला सर्व कचरा कंपोस्ट खत बनविण्यासाठी एकत्रित करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला.
सदर उपक्रमाला संस्थेच्या सचिव मा.माधुरीताई मयूर, आय. क्यू. ए.सी.कमिटीचे मेंबर श्री.गोविंद गुजराथी, श्री. एस.डी.पाटील, यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.रजनी सोनवणे ,माजी प्राचार्य एम. पी. पाटील, प्रा. एन. डी. वाल्हे, प्रा. डॉ. सविता जाधव, श्री. एम. एल. पटेल, श्री. ए. एस. शहा , शुभम गुजराथी, संजय पाटील यांनी परिश्रम घेतले.