आदिवासी एकता परिषदेच्या वतीने चोपडा तहसील कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा
चोपडा,दि.6(प्रतिनिधी) येथील आदिवासी एकता परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी चोपडा तहसील कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला.
आरक्षण बचाव मोर्चा विश्रामगृह येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा नेण्यात आला यावेळी आदिवासी परिषदेचे पदाधिकाऱ्यांसह आदिवासी बांधवांच्या हस्ते तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले .महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती मध्ये बंजारा, गोरा बंजारा,नाईकडा,धनगर या तत्सम जातीच्या लोकांना समावेश करू नये तसेच महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या आदिवासीच्या जमिनी करार तत्तवार देण्या संदर्भात घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा तसेच लडाख मध्ये आदिवासी शास्त्रज्ञ सोनम वागचुंग यांच्यावर केलेला देशद्रोहाचे आरोप हा खोटे असुन त्यांना जेल मधून मुक्त करावे अश्या मागण्या तहसीलदारांकडे मांडण्यात आल्या.
यावेळी आदिवासी एकता परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्तूभाऊ पवार ,सुनील गायकवाड यशवंत भिल्ल, बळीराम बारेला, प्रवीण करनकाळ यांच्यासह आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.