पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिक्षक सुनील बडगुजर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान


पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिक्षक सुनील बडगुजर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

चोपडा दि.५(प्रतिनिधी)मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड जिल्हा परिषद शाळेचे व विविध पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक सुनील रमेश बडगुजर यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन  जिल्हा परिषदेच्यावतिने  गौरविण्यात आले आहे.शिक्षक सुनील बडगुजर यांचा सत्कार जिल्हा व पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराजी पाटिल  यांच्या शुभहस्ते झाला.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून  जळगावचे आमदार राजुमामा भोळे ,मुख्य फार्यकारी अधिकारी मिनल जी करनवाल ' माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रा . झोपे ,प्राथमिक शिक्षण आधिकारी कल्पना पाटील, परदेशी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते .
जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावतीने जिल्ह्यातील १५ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर देण्यात आला त्यात सुनील बडगुजर यांच्या कामाची पावती उल्लेखनीय असल्याने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.याआधी श्री.बडगुजर यांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता तसेच बोदवड जिप शाळेला हायटेक तंत्रज्ञानाच्या वापर करणारी शाळा म्हणून नावलौकिक  मिळविण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी स्पिकिंग रोबोट ही बनवला होता त्यांचे जिल्हाभर नाव गाजले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेने त्यांना मानाचा  पुरस्कार दिला आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ.रविंन्द़ बडगुजर (चोपडा), रंजना बडगुजर,मंगला बडगुजर,अमोल बडगुजर, रमेश बडगुजर,स्वाती बडगुजर , शुक्ल मॅडम (चाळीसगाव) यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने