शासकीय जागेवर वॉल कंपाउंडचे खड्डे खोदण्यास आडकाठी करणाऱ्या चौघांवर पोलीसात गुन्हा

 शासकीय जागेवर वॉल कंपाउंडचे खड्डे खोदण्यास आडकाठी करणाऱ्या चौघांवर पोलीसात गुन्हा

अडावद, ता.चोपडा,दि.५ (प्रतिनिधी):अडावद पोलीस स्टेशन हद्दीपासून पश्चिमेस  उनपदेव क्षेत्रात एक किलोमीटर अंतरावर काल दिनांक 05 /07/ 2025 रोजी दुपारी 12 :00 वाजेच्या सुमारास कक्ष क्रमांक 197 मध्ये फॉरेस्टच्या जमिनीवर कंपाऊंडसाठी खड्डे खोदत असताना चार जणांनीआम्हास जंगलात जाण्यास रस्ता राहणार नाही या कारणावरून मज्जाव करीत वनरक्षकास  मारहाण केल्याची घटना घडली. 

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, उनपदेव क्षेत्रातील 197 मध्ये संरक्षण वॉल कंपाउंड चे खड्डे खोदत असताना वनरक्षक रुपेश राजू तायडे ,संजय माळी आणि इतर सहकाऱ्यांना येथे कंपाउंड करू नका आम्हाला जंगलामध्ये जाण्यासाठी रस्ता राहणार नाही असे सांगून सुभाराम गुलाब बारेला ,प्रेमसिंग गुलाब बारेला, खेलसिंग गुलाब बारेला  व निर्मला खेलसिंग बारेला ( रा. रामजी पाडा ) ह्या सर्वांनी एकत्रित येत शिवीगाळ करून मारहाण केली.याप्रकरणी तायडे यांच्या तक्रारीवरून चारही आरोपीतांवर अडावद पोलीस स्टेशन सीसीटीएनएस नंबर 206/ 2025 भारतीय न्याय संहिता कलम 132 ,115 (2), 352 (3) 5 प्रमाणे पुन्हा नोंदवण्यात आलाअसून पुढील तपास सपोनी प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शरीफ तडवी हे करीत  आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने