शेतकरी बांधवांनो ..! कापुस विक्रीसाठी आता नोंदणी करा आपल्याच मोबाईलवरून ..भाव असणार ८ हजाराच्यावर .. चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितचे आवाहन

 

शेतकरी बांधवांनो ..! कापुस विक्रीसाठी आता नोंदणी करा आपल्याच मोबाईलवरून ..भाव असणार ८ हजाराच्यावर .. चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितचे आवाहन

चोपडा दि.१(प्रतिनिधी) :- चोपडा कृषी बाजार समितीच्या वतीने सीसीआय कापुस खरेदी केंद्रात कापुस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी "कपास किसान मोबाईल अॅपव्दारे" मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी केले आहे . त्यामुळे आता शेतकऱ्यांना होणार त्रास टळणार असून आपल्या मोबाईलवरून ही नोंदणी करता येणार आहे.शिवाय महिनाभर ही नोंद करता येईल मात्र ३०सप्टेंबर ही तारीख शेवटची तारीख असल्याने ती डावलू नका असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बाजार समितीच्यावतीने सीसीआय कापुस खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार असुन सन २०२५-२०२६ या हंगामासाठी कापसाला ८११० प्रति क्विंटल भाव राहणार आहे .कापुस उत्पादकांनी कापुस विक्रीसाठी मुदतीत नांव नोंदणीसाठी प्लेस्टोअर वरून कपास किसान अॅप डाऊनलोड करून नोंदणी करावी कापुस खरेदी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत व्हावी, शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर जास्त वेळ थांबावे लागू नये, शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी ही सुविधा करण्यांत आली आहे दिनांक ०१/०९/२०२५ चे ३०/०९/२०२५ दरम्यान कापुस विक्रीसाठीची नावनोंदणी करावी त्यामुळे शेतकऱ्यांना सोयीनुसार विक्रीची तारीख व खरेदी केंद्र निश्चित करता येणार आहे सर्व प्रक्रिया मोबाईल वरच होणार असुन शेतकऱ्यांनी २०२५-२०२६ च्या हंगामाचा कापूस पीकपेरा सातबारा उतारा, आधारकार्ड, फोटो, मोबाईल सोबत ठेवावा मुदतीत नोंदणी करावी काही अडचण आल्यास बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने