बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांत प्रचंड भिती.. रात्रीच्या शेती पंप विद्युत पुरवठ्याचा वेळेत बदल करा हातेड, विटनेर , वाळकी ,मालखेडा अनवर्दे खुर्द, बुधगाव व विचखेडा परिसरातून मागणी..

 

बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांत प्रचंड भिती.. रात्रीच्या शेती पंप विद्युत पुरवठ्याचा वेळेत बदल करा हातेड, विटनेर , वाळकी ,मालखेडा अनवर्दे खुर्द, बुधगाव, विचखेडा परिसरातून मागणी..


चोपडा दि.३१(प्रतिनिधी)तालुक्यातील हातेड, विटनेर , वाळकी मालखेडा अनवर्दे खुर्द, बुधगाव,विचखेडा   परिसरात बिबट्यांच्या वावर जोमाने वाढला असल्याने शेतकरी वर्गात प्रचंड भिती पसरली आहे. या भागात बिबट्याने अनेक प्राण्यांवर ताव मारला असून रोजच कुठे ना कुठे दर्शन देत असल्याने शेतकऱ्यांसह मजूर वर्गही हवालदिल  झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने रात्रीच्या शेती पंप विद्युत पुरवठ्याचा टाईम टेबलमध्ये तूर्त बदल करावा अशी जोरदार मागणी होत आहे.

रात्रीचे विद्यूत पुरवठा हा रात्री ९:२० ते सकाळी ५:२० असा आठ तासांचा आहे. त्यात बदल करून रात्री १२:००ते सकाळी ८:००वाजेपावेतो करावा जेणेकरून करून शेती पिकाला सकाळी सकाळी पाणी भरणा करता येईल व बिबट्या पासून बचावही करता येईल.कारण या भागात  रमेश हिंमत यांच्या शेतातील वासराचा बिबट्याने फाडशा पाडला त्यानंतर लगेचच दोन दिवसात तुषार विश्वास सोनवणे (हातेड )यांच्या शेतात तीन वासरं बिबट्याने फस्त केलीत तसेच लोटन कोळी वाळकी यांच्या मालकीचे म्हशी च्या पारडू ला  ठार करून भक्ष बनविले आहे.त्याचप्रमाणे रोजच कुठे ना कुठे दर्शन देत असल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.तरी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्रीच्या शेती पंप विद्युत पुरवठ्याचा वेळेत अंशतः बदल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर असून ईतर पिकांनाही पाण्याची नितांत गरज आहे. तरी विद्युत मंडळ शेतकऱ्यांचे हित पाहता रात्रीच्या वेळापत्रकात  बदल करेल अशी अपेक्षा बळीराजांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने