प्रताप विद्यामंदिर शाळेची "आयआयटी मद्रास" आंतरराष्ट्रीय संस्थेशी शैक्षणिक भागीदारी.. आता चोपड्यात तयार होणार कोहिनूर विद्यार्थी
चोपडा दि.२७(प्रतिनिधी) : भारत देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा आयटी मद्रास या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त सार्वजनिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित अशा आठ शिक्षण संस्थांपैकी एक प्रमुख संस्था मानली जाते. या आंतरराष्ट्रीय संस्थेची शैक्षणिक स्वरुपाची भागीदारी करण्याचा मान 108 वर्षाची उज्वल परंपरा असलेल्या चौपड़ा एज्युकेशन सोसायटीच्या प्रताप विद्यामंदिर या शाळेला मिळालेला आहे.
खान्देशमधील विशेषता जळगाव जिल्ह्यातील पहिली अनुदानित शासकीय शाळा म्हणून आय. आय. टी मद्रासशी भागीदारी करण्याचा बहुमान प्रताप विद्यामंदिर चोपडा या शाळेने मिळवलेला आहे ही अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब आहे असे संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी सांगितले त्यापुढे म्हणाल्या की या शैक्षणिक उपक्रमामुळे अत्यंत नाममात्र शुल्कामध्ये विद्यालयाच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आयआयटी मद्रास या आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वप्न असलेल्या ड्रीम इन्स्टिट्यूट चे कोर्सेस करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या आय.आय.टी मद्रास या अत्यंत नामवंत शैक्षणिक संस्थेशी प्रताप विदया मंदिराचा (Educational Tie up) शैक्षणिक भागीदारीचे संस्थेचे अध्यक्ष शैलाबेन मयूर संस्थेचे उपाध्यक्ष श्री विश्वनाथजी अग्रवाल, चोपडा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री राजाभाई मयूर, संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, संस्थेचे संचालकश्री चंद्रहासभाई गुजराथी, श्री भूपेंद्रभाई गुजराथी,श्री रमेशकाका जैन, संस्थेचे समन्वयक श्री गोविंद भाई गुजराथी, शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत भाई गुजराथी तसेच शाळेचे सर्व प्रशासकीय पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.
108 वर्षाची उज्वल परंपरा असलेल्या चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिर चोपडा या शाळेला जागतिक दर्जाच्या आयआयटी मद्रास या संस्थेची शैक्षणिक भागीदारीमुळे विद्यालयातील तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अत्यंत नाममात्र शुल्कामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सायन्स, आर्किटेक्चर, एरोस्पेस इकॉनॉमिक्स, इंट्रोडक्शन टू लॉ, फायनान्स अशा आजकालच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या अनेक विविध क्षेत्रांमधील शॉर्ट टर्म कोर्सेस करून आयआयटी सारख्या प्रतिष्ठित संस्थेशी जोडण्याचा अत्यंत चांगला उपक्रम शाळेने हाती घेतलेला आहे. अशी प्रतिक्रिया चोपड़ा एज्युकेशन सोसायटीच्या विविध ज्ञान शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.