आदिवासी विद्यार्थ्याला एस.टी. बसमधून उतरविल्याच्या प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा तीव्र निषेध!

 

आदिवासी विद्यार्थ्याला एस.टी. बसमधून उतरविल्याच्या प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा तीव्र निषेध!

चोपडा दि.२९(प्रतिनिधी)दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी एक  अडावद येथे शिक्षण घेणारा, उनपदेव (शरभंगऋषी पाडा) येथील रहिवासी व आदिवासी समाजातील पाचवीत शिकणारा विद्यार्थी बादल गजीराम पावरा याला केवळ बस पासची मुदत संपल्यामुळे, एसटी बसच्या वाहकाकडून रस्त्यात उतरविण्यात आल्याचा दुर्दैवी घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून चोपडा आगारप्रमुख यांना  दिनांक 29 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.

निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या:आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास योजना त्वरीत लागू करावी,सर्व बस कर्मचाऱ्यांना संवेदनशीलतेचे प्रशिक्षण द्यावे.पीडित विद्यार्थ्याचे समुपदेशन करून त्याला शैक्षणिक व मानसिक आधार द्यावा,शासन आणि एसटी प्रशासनाने सार्वजनिक वाहतूक ही केवळ सेवा नसून अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, हे लक्षात ठेवून तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली आहे. अन्यथा आंदोलनात्मक मार्ग अवलंबण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

या वेळी निवेदन देताना मनसेचे नगरसेवक माजी जिल्हाध्यक्ष श्री. अनिलभाऊ वानखेडे, मनविसे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. कल्पेश पवार, जिल्हा सचिव श्री. विष्णू कोळी (रावेर लोकसभा), उपाध्यक्ष निखिल पाटील, तालुका संघटक चेतन पवार, उपाध्यक्ष नितीन कोळी, महाराष्ट्र सैनिक दीपक पाटील उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने