संविधानाचा गौरव करणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिकता : जयसिंग वाघ

 संविधानाचा गौरव करणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिकता : जयसिंग वाघ

        जळगाव दि.२(प्रतिनिधी) :येथील प्राईम पब्लिकेशन च्या मुख्य सभागृहात धुळे येथील भटू अंबर मंगळे लिखित ' संविधान गौरव '  या पुस्तकाचे विमोचन करतांना वाघ बोलत होते.  जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की , आज संविधान हा विषय राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात चर्चिला जास्त आहे , देशभरातून विविध लेखक या विषयावर पुस्तकं लिहीत आहेत , विविध कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून सोप्या भाषेत प्रयोग सादर करीत आहेत , सर्वसामान्य जनता संविधान वाचण्याचा व समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे ही समाधानाची बाब जरूर आहे पण संविधानाचा धोका मात्र कमी झाल्याचे दिसत नाही हे सत्य नाकारता येणार नाही . 

        अध्यक्षस्थानी जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते , त्यांनी सांगितले की , भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा असून त्या आधारे देशाचा सर्व कारभार चालत असतो . संविधानावर जनजागृती करणे आज काळाची गरज बनली आहे .

        प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी  संविधानाच्या निर्मितीचा इतिहास सांगून हा इतिहास सुध्दा पुस्तकरूपाने समोर येणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा पाटील , सूत्रसंचालन प्रदीप पाटील , आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश वानखेडे , परिचय सोमा भालेराव , स्वागत गौतम वाकोडे , अरुण जोशी यांनी केले . लेखक भटू मंगळे यांनी पुस्तक लिहिण्या मागील भूमिका विषद केली .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने