श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन.. बी.टेक प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत
चोपडा दि.०2 सप्टेंबर २०२५(प्रतिनिधी) :महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलीटेक्निक), चोपडा येथे बी.टेक प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे भव्य आयोजन महाविद्यालयाने केले.
या कार्यक्रमास प्रा. नरेंद्र सोनवणे (केंद्र प्रमुख, पंचायत समिती चोपडा), प्रा. मिलिंद पाटील (प्राचार्य, पंकज ग्लोबल स्कूल) व प्रा. व्ही. आर. पाटील (प्राचार्य, पंकज विद्यालय, चोपडा) व महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. ए .एन.बोरसे हे उपस्थित राहिले यावेळी मान्यवरांनी विध्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. एन. बोरसे यांनी या कार्याक्रमचे अध्यक्ष स्थान भुषविले व आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षणासोबत शिस्त, प्रामाणिकपणा व चारित्र्य हेच यशाची गुरुकिल्ली आहेत. महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील.” या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अॅड. संदीप सुरेश पाटील व सचिव . डॉ. स्मिता संदीप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. असा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. एस. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एस. इ. शिसोदे यांनी केले. बी.टेक प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु झालेला हा इंडक्शन प्रोग्राम पुढील सहा दिवस चालणार असून विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी दिशा दिली जाणार आहे. महाविद्यालय परिसरात कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.