आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभ हस्ते जिल्हा पोलीस अधिक्षकांसह गणेश भक्तांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार
चोपडा दि.०१ (प्रतिनिधी): चोपड़ा शहरात गणपती विसर्जन हे अवघ्या पाच दिवसाचे असते तरीही मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात, धुमधडाक्यात साजरा होते पण तोबा गर्दीमुळे अनेकांची धडकी भरलेली असते म्हणून पोलिसांसोबत आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार सौ. लताताई सोनवणे हेही दिवसभर तळ ठोकुन असतात व सर्व गणेश भक्तांचा सन्मान चिन्ह देऊन उत्साह वाढविण्याचे काम करीत असतात. तसेच सर्व पक्षीय कार्यकर्तेही आप आपला स्टॉल लावून एकात्मतेचा, शांततेचा संदेश देत मोलाची कामगिरी निभावतात. एव्हढा मोठा वेळ जनहितासाठी देणारे प्रा. चंद्रकांत सोनवणे हे पहिलेच एकमेव आमदार असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. कुटूंबातील घर चालविणाऱ्या मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडणाऱ्याला "अण्णा" ही पदवी दिली जाते. ती पदवी चंद्रकांत सोनवणे यांचे रुपाने खऱ्या अर्थाने सार्थकी लागते हेच चित्र आज चोपडा ह्या परिवाराला या निमित्ताने पाहावयास मिळाल्याची प्रचिती येत असल्याचे अनेक गणेश भक्तांच्या तोंडून ऐकावयास मिळते.या महाकाय मिरवणुकीत लोकांच्या संरक्षणार्थ दिवसभर जीव मुठीत घेऊन जनसेवा बजावणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व गणेश भक्तांचा सत्कार करून उत्साह वाढविण्यात आमदार मोलाची कामगिरी निभावतात त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून संवेदनशील चोपड्यात अनुचित प्रकाराला आळा बसल्याचे बोलले जात आहे.
चोपडा शहरात विघ्नहर्ता श्री गणेश विसर्जन मिरवणुकांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करून आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी शहरातील सर्व गणेश मंडळांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच मिरवणुका शांततेने पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक एन. महेश्वर रेड्डी, अतिरीक्त पोलीस अधिक्षका कविता नेरकर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, विजय ठकरवाड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी राहुल पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, संतोष चव्हाण, व सर्वं सर्वं सहाय्क पोलीस निरीक्षक यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.