पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते राममूर्ती रायसिंग यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
चोपडा दि.५ (संजीव शिरसाठ ) तालुक्यातील वाळकी - शेंदणी येथिल जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक राममुर्ती दगडु रायसिंग यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन जिल्हा परिषदेच्यावतिने गौरविण्यात आले आहे.शिक्षक राममुर्ती दगडु रायसिंग यांचा सहपत्नी सत्कार जिल्हा व पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराजी पाटिल यांच्या शुभहस्ते झाला.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे आमदार राजुमामा भोळे ' मुख्य फार्यकारी अधिकारी मिनल जी करनवाल ' माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रा . झोपे स ' प्राथमिक शिक्षण आधिकारी कल्पना पाटील, परदेशी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते .
उपरोक्त पुरस्कार्थी रायसिंग यांचे आमदार प्रा. चंद्रकातजी सोनवणे, माजी आमदार सौ लताताई सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, पं स . माजी उपसभापती एम व्ही . पाटिल , संचालक 'किरण देवराज , संचालक रावसाहेब पाटिल, संचालक विजय वाघ ,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, माजी नगर सेवक प्रकाश राजपुत ' कोली / कोरी सामाजिक संघटनाराष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव शिरसाठ ,शिक्षक चंदशेखर साळुंखे, कैलास बाविस्कर,पी आर . माळी सर,सरपंच गणेश पाटील (मालखेडा), प्रल्हाद ठाकरे , मधुसुदन बाविस्कर ,मोतिलाल रायसिंग,गव्हरलाल बाविस्कर , सोमनाथ देवराज, गोपाल बाविस्कर,भास्कर बाविस्कर,भरत कंडक्टर आदिंनी अभिनंदन केले आहे .