अडावदला महाजन विद्यालयात शिक्षक दिवस उत्साहात संपन्न

  अडावदला महाजन विद्यालयात शिक्षक दिवस उत्साहात संपन्न 


अडावद ता. चोपडा  दि.५(प्रतिनिधी) : येथे शिक्षक दिना निमित्त एक दिवस विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे दिवसभराचे कामकाज हाताळले. आपल्यातील सोबती आपणास शिक्षक म्हणून शिकवण्यासाठी आल्याने विद्यार्थ्यांनी या शिक्षणाचा आनंद घेतला. शिक्षक विद्यार्थी म्हणून मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने त्यांनी आपले अनुभव मांडले. पाच तारखेला सुटी असल्याने एक दिवस अगोदर शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. 

     ४ रोजी श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून शिकवण्यासाठी दिवसभराचे कामकाज पाहिले. मुख्याध्यापकापासून शिपायापर्यंतची कामे त्यांनी हाताळली. दुपारी विद्यालयाचे उपशिक्षक व्ही. एम. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण कृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एन. ए. महाजन यांनी त्यांच्या जीवनपरिचय विद्यार्थ्यांना करून दिला. विद्यार्थी शिक्षक संजना विजय महाजन या विद्यार्थी शिक्षिकेने प्रास्ताविक करत दिवसभराच्या कामकाजाचा आलेला अनुभव कथन केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितिका नाना महाजन तर विद्यार्थी मुख्याध्यापक प्रदीप शेलकर याने आभार व्यक्त केले.

     यावेळी उपशिक्षक व्हि. एम. महाजन, एस.जी.महाजन, पि. आर. माळी, एस बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि.एस. पवार, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन,अशोक महाजन, आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने