चौगाव प्राथमिक शाळेतील शिक्षिका प्रीतम सोनवणे-वाघ सेट परीक्षा उत्तीर्ण
गणपूर,ता. चोपडा (प्रतिनिधी) दि. 8:चौगाव ता चोपडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका प्रीतम सोनवणे- वाघ यांनी पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत यश मिळवले असून त्यात त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी मराठी या विषयातून हे यश संपादन केले.
प्रीतम सोनवणे- वाघ या लासुर येथील माजी सरपंच निंबा राजाराम वाघ यांच्या स्नुषा व शिक्षक सुनील वाघ यांच्या पत्नी असून त्यांचा येणाऱ्या काळात पीएचडी करण्याचा मानस असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रातून व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले .