धुपे बुद्रुक पीक संरक्षण सोसायटी चेअरमनपदी प्रकाश बाबुराव पाटील
चोपडा,दि.८(प्रतिनिधी) : तालुक्यातील धुपे बुद्रुक येथील पीक संरक्षण सोसायटीचा चेअरमन पदी प्रकाश बाबुराव पाटील व व्हाईस चेअरमन पदी चहार्डी येथील युवराज उदाजी धनगर यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल आमदार अण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे यांच्या हस्ते चेअरमन श्री प्रकाश बाबुराव पाटील व व्हाईस चेअरमन चहार्डी येथील श्री.युवराज उदाजी धनगर, संचालक विजय पाटील, भास्कर पाटील, सतिश बाविस्कर,सुकदेव पाटील,गणेश पाटील, आदींचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी ग्रामस्थ शरद पाटील,पांडुरंग कंखरे हजर होते.
यावेळी मार्केटचे सभापती नरेंद्र पाटील संचालक रावसाहेब पाटील, ऍड.शिवराज पाटील, विजय पाटील, किरण देवराज,प्रताप अण्णा पाटील,महेंद्र भाऊ धनगर, प्रताप पाटील, गोपाल कोळी, विजय पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.