ईद -ए -मिलाद - उन-नबी चोपडा शहरात उत्साहाने साजरी
⭕पैगंबर मुहम्मद यांची शिकवण आणि आदर्शाचे पालन करण्याची मुस्लिम बांधवांनी केली प्रतिज्ञा.
चोपडा दि.५(प्रतिनिधी) : ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण जगभरातील मुस्लिम बांधवांद्वारे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यंदा काही कार्यकर्त्यांनी मिरवणूकीवर पुष्पवृष्टी करून आनंदात भर टाकली.ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी करण्याची नेमकी तारीख चंद्र दिसण्यावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत ईद-ए- मिलाद- उन-नबी 5 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज साजरी केली गेली. इ.स. 570 च्या सुमारास पैगंबर हजरत मुहम्मद यांचा जन्म मक्का येथे झाला होता. समाजात पसरलेला अंधार दूर करण्यासाठी आणि दुष्कर्मांचा अंत करण्यासाठी त्यांचा जन्म झाला असे मानले जाते . पैगंबर मुहम्मद यांचा जन्म रबी-उल-अव्वल महिन्याच्या १२ तारखेला मिलादुन्नबीच्या दिवशी झाला होता.म्हणून, हा दिवस ईद-ए-मिलाद-उन-नबी म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे.तसेच असेही मानले जाते की पैगंबर मुहम्मद यांचे निधन रबी-उल-अव्वल महिन्याच्या 12 व्या दिवशी झाले. म्हणून काही लोक हा दिवस शोक म्हणून देखील साजरा करतात.
ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपली घरे सजवतात आणि मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जातात. या दिवशी दर्ग्यात चादरही अदा केली जाते. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या दिवशी बहुतेक वेळ अल्लाहच्या इबादतीत घालवला जातो. मिरवणुक काढण्यात येऊन एकमेकांना मिठी मारुन शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम पैगंबर मुहम्मद यांची शिकवण आणि आदर्शाचे स्मरण करून ते पालन करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली मशिद मध्ये विशेष नमाज पठन करण्यात आले.
आजच्या मिरवणुकीवर श्री.भरत चौधरी सर,श्री.गोरख कोळी, साबीर शेख सिद्धीक,महजर सैय्यद, यांच्या वतीने सर्व मुस्लिम बाधंवावर पुष्पगुच्छ करून स्वागत करण्यात आले