चोपडा तहसील कार्यालयामध्ये २२ "महसूल दुत "यांची नेमणूक...

 

चोपडा तहसील कार्यालयामध्ये २२ "महसूल दुत "यांची नेमणूक...


चोपडा,दि.७(प्रतिनिधी) तालुक्यातील चार महाविद्यालयातील 22 युवक युवतींची महसूल दूध म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांना तहसीलदार चोपडा यांची कार्यालयात ओळखपत्र व प्रशिक्षण देण्यात आले...

 विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून नाशिक विभागात महसूल दुत यांची नेमणूक करण्यात येत असून सदर महसुल हे महसूल विभागाच्या विविध योजना जसे ई पीक पाहणी, ॲग्री स्टॅक नोंदणी,ई फेरफार, ई हक्क, विविध प्रकारचे दाखले काढणे, प्राधान्य कुटुंब योजना, संजय गांधी योजना, मतदार नोंदणी यांचा प्रचार व प्रसार करणार आहेत...

गाव पातळीवर येऊन योजनांची पुरेशी माहिती नसल्यामुळे अपुऱ्या व तांत्रिक कौशल्य नसल्यामुळे पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यामध्ये येणाऱ्या अडचणी यांच्यावर मात करून योजना गावखेड्यावर पोहोचवण्यासाठी त्यांची मदत होणार आहे...

गाव पातळीवर काम करताना मंडळाधिकारी, तलाठी , ग्रामसेवक व व सर्व सामान्य जनता यांच्यामधील दूत म्हणून काम करताना अधिकारी व पदाधिकारी यांच्यामध्ये देखील समन्वय साधलि जाणार आहे...

सर्वसामान्यांना विविध योजनांची माहिती समजावून सांगणे, पात्रतेच्या अटी विशद करणे, ऑनलाइन काम करण्यासाठी मदत करणे या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकार करण्यात येणार आहे...

तहसील कार्यालयामध्ये दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार भाऊसाहेब थोरात , निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, पी सी धनगर, सुधाकर पाटील यांचे उपस्थितीत सविस्तर प्रशिक्षण देण्यात येऊन कामकाजाविषयी मार्गदर्शन करण्यात आले...

यावेळी महसूल दूत देखील या नवीन जबाबदारी विषयी उत्सुक असून महाविद्यालयीन शिक्षण घेताना एक वेगळा अनुभव ते घेणार आहेत...यामुळे सर्वसामान्य जनतेला कुठल्याही मध्यस्थाशिवाय तहसील कार्यालयातील कामे पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने