अमळनेर उपविभागीय अधिकारी नितीशकुमार मुंडावरे यांच्या हस्ते ग्राम महसूल अधिकारी अमोल सोनवणे यांचा सन्मान

 

अमळनेर उपविभागीय अधिकारी नितीशकुमार मुंडावरे यांच्या हस्ते ग्राम महसूल अधिकारी अमोल सोनवणे यांचा सन्मान


चोपडा दि.७(प्रतिनिधी)चोपडा तालुक्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तावसे बुद्रुक येथील ग्राम विकास अधिकारी  अमोल बाळकृष्ण सोनवणे यांचा प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

महसूल विभागाकडून दि.१ ऑगष्ट ते ७ ऑगष्ट हा आठवडा महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.त्याअनुषंगाने  महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून सन्मानित  केले जाते.याच धर्तीवर हातेड येथील  रहिवासी व तावसे खुर्द येथील ग्राम महसूल अधिकारी अमोल बाळकृष्ण सोनवणे यांचे उत्कृष्ट  कामगिरी पाहता अमळनेर उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
   यावेळी चोपडा येथील तहसिलदार भाऊसाहेब थोरात, अमळनेरचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा तसेच चोपडा व अमळनेर येथील सर्व नायब तहसीलदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने