भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
चोपडा दि.१६(प्रतिनिधी)भारतीय जैन संघटना चोपडा शाखा चे सौजन्याने व दानशुर व्यक्तिंच्या सहकार्याने चोपडा तालुक्यातील चुंचाळे नूतन माध्यमिक विद्यालय येथे शिकत असलेले पहिली व दुसरीचे आदिवासी व होतकरू विद्यार्थ्यांना पाटी पेन्सिल, कंपास, वही व पुस्तक असे शालेय साहित्याचे वितरण आज करण्यात आले
सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष निर्मल बोरा ,जिल्हा सचिव दर्शन देशलहरा, तालुकाध्यक्ष गौरव कोचर, माजी तालुका अध्यक्ष आदेश बरडीया यांचे हस्ते,व संस्थेचे संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत सदरील वाटप करण्यात आले प्रसंगी शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद उपस्थित होते .विद्यार्थ्यांना शालेय किट मिळाल्यानंतर त्यांचे चेहर्यावर आनंद दिसून येत होता