बनावट दस्तऐवजप्रकरणी प्रकाशचंद जैन संस्थेच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल
जामनेर दि.२७जुलै :-विविध शाळा महाविद्यालयांसाठी बनावट दस्तऐवज तयार करून परवानगी मिळविणारा जामनेर येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या संचालकांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर येथील प्रकाशन जैन बहुउद्देशीय संस्थेतर्फे पळासखेडा बुद्रुक शिवारात इंग्रजी माध्यमाची शाळा, वैद्यकीय महाविद्यालये चालविली जातात. या महाविद्यालयांची उभारणी करण्यासाठी अकृषक जागेची आवश्यकता असते. त्यासाठी ग्रामपंचायती पासून तर नगररचना विभागाच्या विविध कार्यालयांची परवानगी लागते. हे सर्व बनावट दस्तऐवज तयार करून प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या संचालकांनी शाळा, महाविद्यालयांना परवानगी मिळवीली असल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राजेश मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात अध्यक्ष राजकुमार कावडीया, उपाध्यक्ष प्रकाशचंद्र ओसवाल, सचिव मनोज कुमार जैन यांचे सहसंचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी करीत आहेत.