पंकज विद्यालयात विद्यार्थी गुणवत्ता व सुरक्षा यास प्राधान्य- डॉ सुरेश बोरोले
चोपडा दि.२७(प्रतिनिधी) : पंकज प्राथमिक विद्यालय चोपडा येथे दिनांक 26 जुलै रोजी इयत्ता तिसरी व चौथी वर्गाच्या पालकांची सभा विद्यालयात आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे होते तर व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले, मुख्याध्यापक एम व्ही पाटील पालक निवृत्त शिक्षक संजय गुरव , राहुल पाटील, सरला अत्तरदे, बावन्नकुळे होते. सभेची सुरुवात इयत्ता विद्यार्थ्यानी अच्युतम केशवम हे सुंदर ईशस्तवन सादर केले. इयत्ता चौथी वर्गांतील विद्यार्थ्यानी हीच अमुची प्रार्थना ही मानवतेची प्रार्थना सादरीकरण केले.
शालेय उपक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विषयावर प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन केले तर स्वयंशिस्त बाबत मनोज अहिरे यांनी सांगितले. मांडले. डॉ सुरेश बोरोले यांनी पालकांना मार्गदर्शन करतांना विद्यालयात विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळावे व विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने संस्था व सर्व शाखा प्राधान्य क्रमाने कार्य करीत आहे.पालकांना विद्यार्थी विकासाच्या टिप्स सांगून पालकांनी आपल्या पाल्यास सर्वांगीण प्रगतीसाठी कशा उपयोगात आणता येईल याचे सविस्तर मार्गदर्शन केले. शालेय वेळेपेक्षा जास्त वेळ विद्यार्थी कुटुंबात असतात.पालकांनी मुलावर सकारात्मक परिणाम होईल अशा सवयी कुटुंबात स्वतः लावाव्यात.आजची स्मार्ट पिढी मोठ्याचे अनुकरण करतात. शालेय गुणाच्या वाढी सोबत कौशल्य विकास,संस्कार, स्वयंशिस्त, आदर, आरोग्य, सद्वर्तन, सुरक्षा याबाबी ही महत्वाच्या आहेत.मुलांमध्ये रुजविण्यासाठी शिक्षक पालक व विद्यार्थी समन्वय असणे गरजेचे आहे.आपल्या पाल्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक करा. त्याने केलेल्या चागल्या कृतीस प्रोत्साहन द्यावे. आपल्या पाल्याचे आदर्श आपणच व्हा असे सांगून.विद्यार्थी घडला तर समाज व राष्ट्र घडेल.व्यवस्था व शिस्त या शाळेच्या शोभा आहेत. मुख्याध्यापक एम व्ही पाटील शिक्षकांचे विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम याची थोडक्यात माहिती दिली. एक पेड माँ के नाम उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.पालकांनी शालेय गुणवत्तेचे व विविध प्रकारच्या उपक्रमांचे कौतुक केले व शिक्षकांशी संवाद साधला.पालक सभेस पालकांची प्रचंड उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वितेसाठी चंद्रकांत जाधव. प्रियंका पाटील या सोबत शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन दिलीप जैस्वाल यांनी केले. आभार प्रदर्शन महेश गुजर यांनी केले.